Babanrao Lonikar : आधी बरळले आता सारवा-सारव, लोणीकर म्हणाले, ट्रोल केलं जातंय, ते 4-5 जणांचं टोळकं..
केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, मुख्यमंत्र्यांनी राज्यात काही कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यामधलीच एक हर घर सोलार ही योजना आहे. मराठवाड्यात 40 हजार घरकुल मी माझ्या मतदारसंघात मंजूर केलेले आहे.
कट्ट्यावर बसणाऱ्या गावातील मुलांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले होते. शेतकऱ्यांना पेरणीचे पैसे सरकार देत असल्याचं सांगत लोणीकरांनी एकप्रकारे उपकाराची भाषा केली आहे. मात्र या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड उठवली जात असताना त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सारवा-सारव केली आहे. ‘माझ्या आयुष्यात मी 40 वर्ष शाखा स्थापनेपासून तर आतापर्यंत भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कधीही चुकीचं वक्तव्य माझ्याकडून झालं नाही आणि माझ्या आयुष्यात मी कधीही चुकीचे वक्तव्य करणार नाही’, असं लोणीकर म्हणाले.
त्यांनी असेही म्हटले की, एका कार्यक्रमात बोलताना मी म्हणालो की, काही राजकीय पक्षांचे दहा लोकांचं टोळकं आहे. हे टोळकं पैसे देऊन लावलेलं आहे आणि यामधले लोक केंद्र सरकारला टार्गेट करतात, मुख्यमंत्र्याला टार्गेट करतात, मला ट्रोल करतात त्यांच्या आई आहे वडील आहे त्यांना आपण खेड्यामध्ये माय म्हणतो बाप म्हणतो, म्हणजे सगळा लाभ केंद्र सरकारचा राज्य सरकारचा घ्यायचा आणि ट्रोल करत राहायचं. काहीही काम न करता फक्त ट्रोल करण्याची ही दहा जणांची एक फॅक्टरी आहे. त्यामुळे मी जे काही बोललेलो आहे फक्त त्या दहा-बारा जणांच्या राजकीय पक्षाच्या टोळक्याला बोललेलो आहे, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

