Narayan Kuche : … तर मला वेळ लागणार नाही, तुमच्या बापाचं…. भाजप आमदाराची बँक मॅनेजरला थेट शिवीगाळ, ऑडिओ व्हायरल
जालन्यातील भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी एका बँक मॅनेजरला फोनवरून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे ,या फोनवरील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून एका बँक मॅनेजरला शिवागाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. आमदार नारायण कुचे यांनी बँकेच्या मॅनेजरला शिवीगाळ केल्याचा मोबाईलवरील संवादाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. नारायण कुचे यांनी जालन्यातील जामखेड येथील युनियन बँकेचे मॅनेजर ललित शिर्लेकर यांना फोनवरून शिवीगाळ केली होती. तीन दिवसांपूर्वीची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती समोर येतेय. या व्हायरल ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टीकरत नाही. आमदार नारायण कुचे यांनी एका शेतकऱ्याच्या कर्ज प्रकरणावरून बँक मॅनेजरला शिवीगाळ करून धमकी दिल्याचे समोर आलं आहे. नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. दरम्यान, याप्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तोंडी तक्रार केलीय. ऐका ऑडिओ…
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

