Suresh Dhas Video : मुंडेंच्या हकालपट्टीनंतर आता पुढे काय? ‘अजून एक-दोन प्रकरणं…’, सुरेश धसांच्या सूचक वक्तव्यानं खळबळ
गेल्या दोन दिवसांपासून देशमुखांच्या क्रूर हत्येचे विदारक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यासंदर्भात सुरेश धस यांनी टीव्ही ९ मराठीला आपली प्रतिक्रिया दिली.
गेल्या अडीच महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकऱणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप आष्टीचे आमदार सुरेश धसांकडून सातत्याने केली जात होती. मात्र अखेर आज मुंडेंचा राजीनामा झाला आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून देशमुखांच्या क्रूर हत्येचे विदारक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. यासंदर्भात सुरेश धस यांनी टीव्ही ९ मराठीला आपली प्रतिक्रिया दिली. धस म्हणाले, मी सभागृहात १६ डिसेंबर रोजीच लक्षात आणून दिलं. पण बरेच लोक म्हणाले सुरेश धस तू अतिरंजित बोलतो. असं नसेल झालं. पण चार्जशीट दाखल झाल्यावर सर्व बाहेर आलं. राज्यात संताप उसळला. मस्साजोग गावच्या लोकांची आणि त्या कुटुंबाची मेंटॅलिटी कशी झाली ते पाहा. त्यामुळे राजीनामा होणं हे महत्त्वाचं आहे, असं धस म्हणाले. धस असेही म्हणाले, सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार एसआयटीकडे आहे. माझ्या आरोपाचं खंडन केलं नाही. सातपुडा बंगल्यावर १९ ऑक्टोबरला खंडणी फायनल होण्यासाठी बैठक झाली होती. हे मी काल बोलत होतो. आजही बोलतो यानंतर बोलत नाही. एसआयटीने चौकशी थांबली असं म्हटलं नाही. चौकशी सुरू आहे. बऱ्याच जणांचे कॉल तपासायचे आहेत. घटना घडल्यानंतर आणि आधी काही लोक आहेत. काही अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहेत. सुदर्शन घुलेला डेंजर बनवणारे काही लोकं आहे. त्यांची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
