Nishikant Dubey : …तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत भाजप खासदार दुबेंचा मोठा दावा
'२०२९ च्या निवडणुकाही मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढाव्या लागतील, ही भारतीय जनता पक्षाची मजबुरी आहे. आज मोदीजींना भाजपची गरज नाही. भाजपला त्यांची गरज आहे.' असंही मुलाखतीत निशिकांत दुबे म्हणाले.
ठाकरे बंधू संदर्भात पटक पटक के मारेंगे असं वक्तव्य केल्यानंतक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार निशिकांत दुबे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. अशातच आता दुबेंनी पंतप्रधान मोदींबद्दल एक मोठे विधान केले आहे. ‘जर नरेंद्र मोदी भाजपचे नेते नसतील तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष हा १५० जागाही जिंकू शकणार नाही’, असं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलं आणि पुन्हा त्यांची चर्चा होऊ लागली आहे. झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तर यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भाजपला पंतप्रधान मोदींची गरज आहे, मोदींना भाजपची नाही. इतकंच नाहीतर पुढील १५-२० वर्षे मोदी पक्षाचे केंद्रीय नेते आणि मुख्य चेहरा राहतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?

