तुमच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन मुंडे बहीण भावात यंदा चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली होती. आता त्यावरून प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.
बीड जिल्हा म्हटलं की सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या भावंडांचा वाद आलाच. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका टीप्पणी करण्याची कोणतीही संधी हे मुंडे भावंड सोडत नाही. आधी फडणवीसांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना लक्ष्य करायच्या तर आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना अनेकदा लक्ष्य करताना दिसल्यायेत. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन मुंडे बहीण भावात यंदा चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. दरम्यान, यालाच प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

