Pankaja Munde : मी धनुभाऊंना परळी देऊन टाकली! पकंजा मुंडे यांचं भुवया उंचावणारं विधान
"परळी धनुभाऊंना देऊन टाकली!" या पंकजा मुंडेंच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. यापुढे पंकजा मुंडे परळीतून निवडणूक लढणार नाहीत का, आणि त्यांचे लक्ष आता माळाकोळी मतदारसंघाकडे वळणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. छगन भुजबळ यांच्या धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांभाळण्याच्या आवाहनानंतर हे विधान चर्चेत आले आहे.
“परळी धनुभाऊंना देऊन टाकली!” असे विधान करून पंकजा मुंडे यांनी नव्या राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की, यापुढे त्या परळीतून निवडणूक लढणार नाहीत का आणि भविष्यात धनंजय मुंडेच परळीतून मुंडे घराण्याचे प्रतिनिधित्व करतील का? माळाकोळी येथे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी पंकजा मुंडे यांनी माळाकोळीवर प्रेम करण्याची इच्छा व्यक्त केली. “परळीचे प्रेम धनुभाऊंना करू द्या, मी त्यांना परळी देऊन टाकली आहे, मला माळाकोळीवर प्रेम करू द्या,” असे त्या म्हणाल्या. माळाकोळी हे लोहा विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे भविष्यात पंकजा मुंडे लोहा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. परळी विधानसभा हा गेली ४५ वर्षे मुंडे घराण्याचा बालेकिल्ला राहिला आहे.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

