मुंबईला केंद्रशासित करण्याचा सोमय्यांचा कट – संजय राऊत
भाजपचे (bjp) नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे.
मुंबई: भाजपचे (bjp) नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे. त्यांच नेतृत्व किरीट सोमय्या (kirit somaiya) करत आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं प्रेझेंटेशन याच भाजपच्या पाच लोकांनी तयार केलं. सर्व चोर आणि लफंगे आहेत. त्यांचं नेतृत्व सोमय्यांकडे आहे. काहीही करून त्यांना मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी सोमय्या हा लफंगा, चोर, हा महाराष्ट्रद्रोही दिल्लीत जात असतो. मी सांगतो त्याला सबळ पुरावे आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Published on: Apr 08, 2022 01:34 PM
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
