संसद भवन परिसरात भाजपचं ‘क्विट इंडिया’; भ्रष्टाचार, परिवारवाद, भारत छोडोच्या खासदारांकडून घोषणा
VIDEO | नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात भाजपचे सर्व खासदार एकवले अन् 'क्विट इंडिया' या अभियानात दर्शविला सहभाग...विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी 'भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण छोडो भारत'चा दिला नारा
नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३ | आजपासून भाजपच्या ‘क्विट इंडिया’ या अभियानाला सुरूवात झाली आहे. संसद भवन परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ भाजपच्या सर्व खासदारांनी ‘क्विट इंडिया’ आंदोलन केले आहे. तर विरोधकांनी आपल्या महायुतीला INDIA हे नाव दिल्यानंतर भाजपकडून ‘क्विट इंडिया’ या अभियानाला सुरूवात करण्यात आली असून संसद भवन परिसरात भाजप खासदार एकवटल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचार, परिवारवाद, भारत छोडो, असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत दिल्यानंतर आजपासून भाजपचं क्विट इंडिया अभियान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 1942 मध्ये या दिवशी ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भाजपने हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी ‘भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण छोडो भारत’चा नारा दिला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

