Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 31 October 2021

शेतकरी किंवा समाजातील अन्य घटकाकडे लक्ष द्यायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही. हे सरकार फक्त पोपटपंची करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Oct 31, 2021 | 6:09 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकरी किंवा समाजातील अन्य घटकाकडे लक्ष द्यायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही. हे सरकार फक्त पोपटपंची करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तसंच 1 नोव्हेंबर रोजी काळी फीत लावून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याचं आवाहनही पाटील यांनी केलं आहे.

नैसर्गिक संकटांनी शेतकरी त्रस्त असताना मदतीऐवजी मविआ सरकार पोपटपंची करतंय. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्यात 29 अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांनीही आत्महत्या केल्यात. ST कर्मचारी, शेतकऱ्यांनो, आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगून सरकारच्या निषेधासाठी सोमवार, 1 नोव्हेंबरला काळी फीत लावूया, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेला केलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें