मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे उबाठा'तील विधान परिषदेचे आमदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे उबाठा’ गटातील नेते आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
या राजकीय घडामोडीनंतर अनेक सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीतील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील भाष्य केले. ते म्हणाले, ‘सचिन अहिर यांनी अर्ज भरला हे कळलं, चालंच आहे. मात्र याला थेट पक्षप्रवेश म्हणणं योग्य नाही. माझ्या माहितीनुसार, विधान परिषदेतील कोणताही MLC अर्ज दाखल करू शकतो; त्याने जर दुसऱ्याच एखाद्या पक्षातून अर्ज दाखल केला, तर त्याला पक्षप्रवेशच करावा लागेल असं नाही.’
Published on: Jun 30, 2026 03:53 PM
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?

