AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका

Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक….सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका

| Updated on: Jun 30, 2026 | 3:05 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या घडामोडीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या घडामोडीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी ठाकरे गटाच्या भविष्यासंदर्भात भाष्य करत आगामी काळात आणखी राजकीय बदल पाहायला मिळतील, असा दावा केला. सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांची या विषयावर प्रतिक्रिया देताना जीभ घसरली. ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नको ते बोलून गेले. “महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जी उबाठा गटाला खाली करणार आहे. टीएमसी सारखंच होणार आहे” असं नितेश राणे म्हणाले. त्यांचा रोख आदित्य ठाकरेंकडे होता. “आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन निवडून यावं परत. राजीनामा द्यावा आणि हिंमतीवर निवडून यावं. सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यामुळे ते सभागृहात बसतात आणि टोमणे मारतात. बिचाऱ्यांचे दिवस अवघड आहेत” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.

“आता उद्धव ठाकरेंनी वरळीतही एक सभा घ्यावी. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातील लोकांचा मूळ स्वभाव आहे, त्यामुळे लोक जात आहेत. जाणारे सर्व लोक महत्त्वाचे आहेत. जो बाळासाहेबांचा झाला नाही. आपल्या वडिलांचा झाला नाही, तो बाकी नेत्यांचा काय होणार?” असं नितेश राणे म्हणाले. “फडणवीसांना पाठिंबा देणार म्हणतात, त्यांनी 2019 मध्ये माती खाल्ली. आता पंतप्रधान पदाला पाठिंबा देण्याची भाषा करत आहे. नीच माणूस आहे हा. डिक्शनरीत नीच इक्वल टू उद्धव ठाकरे होतं” अशी वादग्रस्त टिप्पणी नितेश राणे यांनी केली.

 

Published on: Jun 30, 2026 02:52 PM

Follow Us