Special Report | आर्यन खानवरुन पुन्हा एकदा भाजप Vs मविआ सरकार
हे प्रकरण सुद्धा तितकंच गंभीर आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
नाशिक: एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी एनसीबीची पोलखोल केली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली आहे. दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याची दखल घेतली पाहिजे. फक्त एखादा गोळीबार झाला की न्यायालयीन चौकशी करावी असं नाही. हे प्रकरण सुद्धा तितकंच गंभीर आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. मलिक यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ती चौकशी झाली पाहिजे. कोणतीही चौकशी करा, पण या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशीच केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात स्यूमोटो कारवाई करायलाच हवी, असंही ते म्हणाले.
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
