Mumbai च्या जनतेतर्फे शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम BJP करेल : Ashish Shelar

शिष शेलार यांनी तुंबणाऱ्या मुंबईवरुन शिवसेनेवरही हल्लाबोल केला. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम भाजप करेल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

यावेळी आशिष शेलार यांनी तुंबणाऱ्या मुंबईवरुन शिवसेनेवरही हल्लाबोल केला. शेलार म्हणाले, “आज 26 जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. कित्येक वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. एव्हढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर”

कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कोट्यावधी रुपयांचे प्रोजेक्टच्या नावाखाली १६ वर्षात ३ लाख २० हजार कोटीचा अर्थसंकल्प खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय.. तर तेच. मग हे पैसे गेले कुठे सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचं काय झालं? हे पैसे पाण्यात गेले आणि मुंबईकरांचे जीव टांगणीला लागले आहेत. मुंबईतले पानलोट क्षेत्र मोजलंय का? मिठीनदीवरील अतिक्रमण हटवलं का? पम्पिंग स्टेशनचं काय झालं? आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम भाजप करेल, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI