AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh म्हणतात, 'बाईपण भारी देवा...', मंगळागौर कार्यक्रमात धरला ठेका, Watch Video

Chitra Wagh म्हणतात, ‘बाईपण भारी देवा…’, मंगळागौर कार्यक्रमात धरला ठेका, Watch Video

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Aug 28, 2023 | 8:28 PM
Share

VIDEO | भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रत्नागिरीतील चिपळूणमधील मंगळागौर कार्यक्रमात धरला ठेका, 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील गाण्याच्या धरला ठेवा, बघा नृत्य

रत्नागिरी, २९ ऑगस्ट २०२३ | दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. महिला वर्गात हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. अशातच भारतीय जनता पार्टीकडून आगामी काळातील पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. तर चिपळूणमध्ये आयोजित मंगळागौर कार्यक्रमात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावत बाईपण भारी देवा या गाण्यावर ठेका धरला. यावेळी चिपळूण शहरातील हजारो महिला उपस्थित होत्या. चित्रा वाघ सध्या चिपळूण दौऱ्यावर असून शहरातील विविध भागात दौरे करत आहेत, या दरम्यान त्यांनी महिलांच्या मंगळागौर कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. महिलांच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर मंगळागौरच्या सहभागी महिला गटांनी चित्रा वाघ यांना गाण्यावर नाचण्याची विनंती केल्यानंतर त्या सहभागी झाल्या. बधा व्हिडीओ

Published on: Aug 28, 2023 08:28 PM
Follow Us