पहिल्याच डावात मुरलीधर मोहोळ केंद्रिय मंत्री, घेतली पदाची शपथ
अत्यंत चुरशीची निवडणूक ठरलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे पहीलवान मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय झाला आहे. या मतदार संघातील विजयाने त्यांना थेट केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.
पुणे लोकसभा मतदार संघातून निवडूक लढविणारे मुरलीधर मोहोळ यांनी मोठा विजय मिळाला होता. त्यांना थेट महापौर पदावरुन पहिल्याच डावात खासदार ते थेट केंद्रिय मंत्रिपदाची माळ त्यांचा गळ्यात पडली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात केंद्रिय मंत्री पदाची शपथ घेतली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा. 86,369 मतांनी पराभव केला होता. 4,15,543 मतांनी त्यांचा विजय झाला होता. मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील ब्राह्मण वस्ती असलेल्या पर्वती, कोथरुड परिसरातून मोठं मताधिक्य मिळाले. कोथरुड, पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत. त्यांच्या एकगठ्ठा मतांनी मुरलीधर मोहोळ हे थेट महापौर पदावरुन खासदार आणि खासदार पदावरुन थेट केंद्रिय मंत्री झाले आहेत.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

