AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे Satyajit Kadam यांचं नाव

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 1:55 AM
Share

भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. सत्यजीत कदम यांनी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे.

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. सत्यजीत कदम यांनी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. तर, भाजपनं सत्यजित कदम (Satyajeet Kadam) आणि महेश जाधव (Mahesh Jadhav) यांचं नाव पाठवलं होतं. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं असून त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.