Pune BIG News : पुण्यातील हे 3 ठिकाणं बॉम्बने उडवणार, पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला फोन अन्…
पुण्यातील तीन ठिकाणांवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा पोलिसांना धमकीचा फोन आला. यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तरी तपास सुरू आहे.
पुण्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील येरवडा, पुणे स्टेशन आणि भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला आहे. पुण्यातील या तीन ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या फोननंतर पोलिसांकडून मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. धमकी नेमकी कोणाकडून आली याचा शोध रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीमुसार, पुण्यातील हे तीन ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन कॉल आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या ११२ या आप्तकालीन क्रमांकावर आला. या धमकीच्या फोनमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Published on: May 21, 2025 03:40 PM
Latest Videos
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

