परमबीर सिंह यांना धक्का, हायकोर्टनं राज्य सरकारविरोधातील याचिका फेटाळली
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावली आहे. परमबीरसिंग यांनी योग्य त्या लवादापुढं दाद मागावी, असं हायकोर्टानं सांगितलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावली आहे. परमबीरसिंग यांनी योग्य त्या लवादापुढं दाद मागावी, असं हायकोर्टानं सांगितलं आहे. परमबीर सिंग यांना हायकोर्टाकडून दिलासा देण्यात आलेला नाही. परमबीर सिंग राज्य सरकारनं सुरु केलेल्या कायदेशीर चौकशीला आव्हान देत याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाकडून ती याचिका फेटाळण्यात आली आहे. ठाकरे सरकारनं परमबीर सिंग यांच्या वरील आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना केली आहे. चांदिवाल समिती पुढे हजर राहण्यास परमबीर सिंग टाळाटाळ करत असल्याचं समोरं आलं होतं. हायकोर्टाच्या निर्णयानंतर परमबीर सिंग काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

