Prakash Ambedkar : आमच्या वेळ वाया गेला… प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली अन्..
विधानसभेच्या वेळी पाच वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात बोलताना हायकोर्टानं असं म्हटलं की, ही याचिका काल दिवसभर ऐकली. इतकंच नाहीतर त्यामुळे आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, अशी टिप्पणी हायकोर्टान केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला असल्याचे समोर आले आहे. प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाच्या विरोधातली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशीच्या वाढीव मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता. सायंकाळी पाच वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात वंचितचे पदाधिकारी चेतन अहिरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तर स्वतः प्रकाश आंबेडकर हायकोर्टामध्ये या संदर्भात युक्तिवाद करत होते. मात्र मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असं सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने म्हटलं. वेळ वाया गेल्यामुळे आम्ही दंडही ठोठावू शकलो असतो असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

