Breaking | ठाकरे सरकार अधिवेशनात तीन ठराव मांडणार ; सूत्रांची माहिती
पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं असलं तरीही हे अधिवेशन चांगलंच गाजणार असल्याची शक्यता आहे. तसा इशाराच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं दिलाय. दरम्यान, या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार 3 मुख्य प्रस्ताव मांडणार असल्याची शक्यता आहे.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवार (5 जुलै) पासून सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन दोन दिवसांच करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं असलं तरीही हे अधिवेशन चांगलंच गाजणार असल्याची शक्यता आहे. तसा इशाराच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं दिलाय. दरम्यान, या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार 3 मुख्य प्रस्ताव मांडणार असल्याची शक्यता आहे. त्यात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक इम्पेरिकल डाटा केंद्राने द्यावा, या प्रस्तावांचा समावेश आहे.
Published on: Jul 04, 2021 10:59 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

