Sudhir Sawant | समीर वानखेडेंचं कर्तव्य निभावतायेत – सुधीर सावंत

सैनिक फेडरेशन समीर वानखेडे यांच्यासोबत आहे. आमचे 17 जण आता पंच म्हणून काम करत आहेत. एनसीबीला पूर्ण स्पोर्ट करणार. आम्ही शरद पवार यांचीही भेट घेणार आहोत. आमच्या फ्लेचर पटेल याच्यावर चुकीचा आरोप केला आहे, असे सुधीर सावंत म्हणाले.

मुंबई : ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज एनसीबीचे डिडिजी मुठा अशोक जैन यांची भेट घेतली. यावेळी त्याच्यांसोबत लष्करातील माजी अधिकारी , एनसीबीचे पंच फ्लेचर पटेल आदी होते. त्यांनी एनसीबीच्या कारवाईला आपला पाठिंबा व्यक्त केला. सुधीर सावंत हे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. यापुढे अनेक माजी सैनिक पंच म्हणून पुढे येणार असल्याच त्यांनी सांगितलंय. आम्ही ड्रग्सच्या विरोधात आहोत. पंजाबमध्ये ड्रग्स ळे दहशतवाद वाढला होता. आता महाराष्ट्राला संपवायला निघाले आहेत. पाकिस्तान, आयएसआय हे आपल्या देशात ड्रग्स पाठवत असत. गुजरातेत 3 हजार कोटी रुपयांचं ड्रग्स सापडलं पण त्यावर कारवाई होत नाही. सैनिक फेडरेशन समीर वानखेडे यांच्यासोबत आहे. आमचे 17 जण आता पंच म्हणून काम करत आहेत. एनसीबीला पूर्ण स्पोर्ट करणार. आम्ही शरद पवार यांचीही भेट घेणार आहोत. आमच्या फ्लेचर पटेल याच्यावर चुकीचा आरोप केला आहे, असे सुधीर सावंत म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI