AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Charan Waghmare : ... म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला, BRS च्या नेत्यानं सांगितलं यशाचं गमक

Charan Waghmare : … म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला, BRS च्या नेत्यानं सांगितलं यशाचं गमक

| Updated on: Nov 06, 2023 | 7:09 PM
Share

मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. लोकांनी आमच्यावर पूर्व विश्वास टाकलेला असल्याने त्याचा निकाल लागलेला असे म्हणत भारत राष्ट्र समितीचे विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भंडारा, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यभरात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे आज निकाल समोर आले आहे. यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरल्याचे दिसंतय तर बीआरएसचा विजयही झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात तुमसर विधानसभेतून बीआरएस पक्षांची सुरूवात झाली आहे आणि ही सुरूवात शेवटापर्यंत नक्की पोहोचणार असल्याचा विश्वास बीआरएस पक्षाचे समन्वयक चरण वाघमारे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी त्यांच्या विजयाचे गमक देखील सांगितले. चरण वाघमारे म्हणाले, लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि जी सदस्य नोंदणी झाली. राज्य सरकारनं विकास केवळ टिव्ही आणि मीडियाच्या माध्यमातून केला आहे. प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर विकास झालेला नाही. आमचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी ग्राऊंडवर काम करतो. त्यामुळं मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. लोकांनी आमच्यावर पूर्व विश्वास टाकलेला असल्याने त्याचा निकाल लागलेला असे म्हणत भारत राष्ट्र समितीचे विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Published on: Nov 06, 2023 07:09 PM