राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या बाकाखाली नोटांचं बंडल? मनु सिंघवींनी आरोप फेटाळले; म्हणाले, ‘3 मिनिटंच बसलो अन् 500 रू…’
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी राज्यसभेच्या सभागृहात 222 क्रमांकाच्या बाकाखाली पैशांचं बंडल मिळाल्याची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली.
राज्यसभेत आज काँग्रेस खासदाराच्या बाकाखाली नोटांचं बंडल सापडलं. सभागृहात रोख रूपये सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर राज्यसभेत एकच गोंधळ झाला. दरम्यान, सभापती जगदीप धनखड यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र काँग्रेस खासदार मनु सिंघवी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. “आपण राज्यसभेत जात होतो त्यावेळी आपल्याकडे केवळ 500 रुपयांची एक नोट होती”, असं अभिषेक मनू सिंघवी म्हणाले. तर “संसदेत प्रत्येकाची जागा निश्चित असायला हवी. संबंधित जागेवर लॉक असायला हवे, ज्याची चावी फक्त संबंधित खासदाराकडे असायला हवी, जेणेकरुन प्रत्येक सदस्य आपल्या निश्चित जागेवर बसू शकतील”, असंही अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी राज्यसभेच्या सभागृहात 222 क्रमांकाच्या बाकाखाली पैशांचं बंडल मिळाल्याची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली. जगदीप धनखड यांनी संबंधित माहिती दिल्यानंतर सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ सुरु केला होता. बघा नेमकं काय घडलं?