Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ करदात्यांच्या पैशाचा अपव्यय, हायकोर्टात कोणी दिलं आव्हान?
नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटटने लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. बघा नेमकं काय झालं?
लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याने या योजनेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे, असे म्हणत नवी मुंबईतील एका सीएकडून हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना ही करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याने तिजोरीवर आर्थिक भार येत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली होती. पण कोर्टाने त्यास नकार दिला आहे. योजनेला स्थगिती देता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

