Cabinet Expansion: 15 सप्टेंबरपर्यंत होणार पुढचा मंत्रिमंडळ विस्तार- बच्चू कडू

. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडूंना पुन्हा प्रश्न केला होता. यावेळी त्यांनी ही नाराजी क्षणिक असल्याचे सांगितले.

नितीश गाडगे

|

Aug 18, 2022 | 10:42 AM

बच्चू कडू यांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांनी मला शब्द दिला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करू, असे त्यांनी मला सांगितल्याचे बच्चू कडू म्हणाले. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडूंना पुन्हा प्रश्न केला होता. यावेळी त्यांनी ही नाराजी क्षणिक असल्याचे सांगितले. शिंदे सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. परंतू पहिल्या विस्तारात कडूंचा नंबर लागला नव्हता. तसेच 18 जणांना एकाचवेळी कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. पुढच्या विस्तारात बहुतांश मंत्रिपदे ही राज्यमंत्री असण्याची शक्‍यता आहे. यामुळे नाराजांची राज्य मंत्री पदावर वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें