देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आणखी मोठी कारवाई करण्यात आली असून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ‘गॉड’ नावाने नंबर सेव असलेल्या तेजस शाह या विद्यार्थ्याला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. तपासात तेजस शाह याने मनीषा हवालदार हिच्याकडून पेपर विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास आणखी वेगाने पुढे जात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, सीबीआयने डॉक्टर मनोज शिरूरे यांनाही अटक केली आहे. मनोज शिरूरे यांनी देखील पेपर मिळवल्याचा संशय सीबीआयला होता. यापूर्वी पुणे आणि लातूर येथे त्यांची सखोल चौकशी करण्यात आली होती. चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर सीबीआयने दोघांनाही अधिकृतपणे अटक केली आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सीबीआयकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
देश हादरवणाऱ्या NEET पेपरफुटीत नवा स्फोट; सीबीआयकडून आणखी दोघांना अटक
एकच खळबळ! गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, हे नेमकं...
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा