AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चीट

परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चीट

| Updated on: Jul 10, 2025 | 4:56 PM
Share

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग खंडणी आणि धमकी प्रकरणात क्लीन चीट दिली आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी आणि धमकी प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ माजवली होती. या प्रकरणात सीबीआयने तपास बंद करण्याचा अहवाल मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, 2016-17 मध्ये घडलेल्या या प्रकरणात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले नाहीत, तसेच कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही.

सीबीआयने आपल्या अहवालात नमूद केले की, तक्रारदार अग्रवाल यांचा आर्थिक व्यवहारात अप्रामाणिकपणाचा इतिहास आहे आणि ते खोट्या दिवाणी व फौजदारी खटल्यांद्वारे लोकांना अडकवण्यासाठी ओळखले जातात. तसेच, अग्रवाल आणि बिल्डर संजय पुनमिया यांच्यातील समझोता कोणत्याही दबावाशिवाय किंवा जबरदस्तीशिवाय झाल्याचे तपासात आढळले आहे.

परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबईतील मरिन ड्राइव्ह, गोरेगाव, अकोला आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यांमध्ये एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी कोपरी पोलीस ठाण्यातील खंडणी प्रकरणात सीबीआयने तपास बंद केला आहे, परंतु इतर चार प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे.

Published on: Jul 10, 2025 04:56 PM