Central Railway Update : मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा, कारण नेमकं काय? ट्रॅकवरून चालण्याचा प्रवाशांनी पत्कारला धोका
दरम्यान, आज रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत असताना मध्य रेल्वेवर लोकल विलंबाने धावत असल्याने मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. अंबरनाथ ते सीएसएमटी स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल पाऊण तास उशिराने धावत आहे.
मध्य रेल्वेवर लोकल वाहतूक सेवेचा खोळंबा झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेवर लोकल विलंबाने धावत असल्याने मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. अंबरनाथ ते सीएसएमटी स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल पाऊण तास उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनमधून उतरून लोकल ट्रेन धावणाऱ्या ट्रॅकमधून चालण्याचा धोका पत्कारला आहे. दरम्यान, आज रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी या मार्गावर सकाळी साडे दहा ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ब्लॉक आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन रेल्वेमार्गावर ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम मार्गावरील माहिम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

