राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदा बारामतीत दोन्ही पवार एकत्र, भाजप साशंक?
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही उलथापालथ होणार का? अशी चर्चा सुरू आहे. कारण बारामतीमध्ये दिवाळीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार का अशा चर्चांना उधाण आलंय. तर या भेटीवर शिंदे गट आणि भाजपच्या प्रतिक्रिया भुवया उंचवणाऱ्या आहेत.
मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही उलथापालथ होणार का? अशी चर्चा सुरू आहे. कारण बारामतीमध्ये दिवाळीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेत. यावर सत्ताधारी नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी भुवया उंचवल्यात. दिवाळीनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेत. मात्र या भेटीवरून शिंदे गट आणि भाजपच्या मनात शंकेची पाल चुकचुकतेय. राष्ट्रवादी फुटीनंतर पवार कुटुंब दिवाळीत पहिल्यांदाच एकत्र आलेत. यावर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया भुवया उंचावणारी आहे. ‘पवार कुटुंबाचं हे वैशिष्ट्य आहे की, त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे घटना घडल्याशिवाय कळत नाही.’ तर ‘नेमकं काय चाललंय?’, असा सवाल करत शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी शंका उपस्थित केली. तर कौटुंबिक भेट असल्याचे म्हणत राजकीय विधानं नको, असे पवार भेटीवर संजय शिरसाट म्हणाले. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट





