Chandrapur | 9 जीव आगीत जिवंत जळाले! चंद्रपुरात ट्रक अपघातानंतर भीषण अग्नितांडव

ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 20, 2022 | 12:50 PM

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात (Chandrapur Accident) 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये (Truck Accident) हा भीषण अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक मध्ये झाली समोरासमोर धडक झाली. आणि अपघातानंतर भीषण आग (Fire) लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतात समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें