Bachchu Kadu : बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन, म्हणाले तातडीने…
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अशातच मोठी घडामोड आज घडली आहे.
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. अशातच . आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. ‘देशात मोठी विमानाची घटना झाली असताना, हा देश दुखाःमध्ये आहे. सर्वांचे मन सून्न झाले आहे, त्यामुळे अन्नत्याग आंदोलन मागे घ्या’, अशी विनंती अमरावतीचे पालकमंत्री, भाजपच्या चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना केली यावेळी ते असेही म्हणाले, तुम्ही शासनाची विनंती मान्य करा, तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्ही पुढे सुद्धा आंदोलन करा.
मात्र आता आंदोलन मागे घ्या बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना अशी विनंती केली मात्र आम्ही आज उपोषण सोडणार नाही, आम्ही उद्या सर्वांचा विचार घेऊ, असं म्हणत बच्चू कडू आपल्या अन्नत्याग उपोषणावर ठाम आहेत. तर बावनकुळेंनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी म्हटल्याची बावनकुळेंनी सांगितले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

