AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केलं आहे, आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6 दिवस आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज त्यांची भेट घेतली.

मोठी बातमी! अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
| Updated on: Jun 13, 2025 | 7:18 PM
Share

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल, त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ. त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, असं फडणवीस यांनी म्हटल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

ज्या 17 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत,  त्यासाठी आम्ही बैठक घेऊ, या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील, या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल.  दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आनावं लागतं, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल. त्यामध्ये किती वाढ करायची, ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील.

दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल व नंतर त्यावर तोडगा काढू, असंही बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं. मात्र त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी तिथे उपस्थित शेतकऱ्यांना विचारलं की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून, सरसकट कर्जमाफी व्हावी, असं म्हटलं आहे.

कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ, असं अश्वासनही यावेळी बावनकुळे यांनी दिलं आहे. मात्र बच्चू कडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत, आम्ही यावर समाधानी नाही, आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित