AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tardeo Estate Agent: तो फ्लॅट वारकऱ्याचा..; जाहिरात अंगाशी आल्यानंतर इस्टेट एजंट भावेश कावरेची सारवासारव

मांसाहार करणाऱ्यांना फ्लॅट मिळणार नाही, अशी जाहिरात करणाऱ्या दलाल भावेश कावरेच्या व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर आता भावेशने त्याची बाजू मांडली आहे. तो फ्लॅट वारकऱ्याचा होता, असं त्याने म्हटलंय.

Tardeo Estate Agent: तो फ्लॅट वारकऱ्याचा..; जाहिरात अंगाशी आल्यानंतर इस्टेट एजंट भावेश कावरेची सारवासारव
Bhavesh KawareImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 13, 2026 | 1:54 PM
Share

रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेच्या एका व्हिडीओवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. यावरून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्या व्हिडीओवर आता भावेश कावरेनं स्पष्टीकरण दिलं आहे. “ऐंशी टक्के लोक मांसाहार करतात, वीस टक्के लोक अजूनही शाकाहारी आहेत. त्यांच्यासाठीच मी हा व्हिडीओ बनवला आहे. काहींना नॉनव्हेज आवडत नाही, मांसाहाराच्या वासाचाही त्रास होतो. इथे मराठी माणसाचा मुद्दाच नाही. त्याला मुद्दा बनवला जातोय. मला स्वत:ला भेदभाव पटत नाही,” असं तो म्हणाला. इतकंच नव्हे तर तो फ्लॅट एका मराठी माणसाचा होता, तो वारकरी असून त्याची श्रद्धा होती की हा फ्लॅट शाकाहारी लोकांकडेच जावा, असंही स्पष्टीकरण त्याने दिलं आहे.

काय म्हणाला भावेश?

“शाकाहारी असाल तर महाराष्ट्र सोडून द्या, असा मुद्दा जाणूनबुजून बनवला जातोय. माझं स्वत:चं चिकनचं दुकान आहे आणि गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही ते दुकान चालवतोय. याचा अर्थ असा नाही की मी लोकांना बळजबरीने मांसाहार भरवेन. तो फ्लॅट कुठे आणि कोणाला विकायचा हे मी नाही तर मालक ठरवतात. मला हा भेदभाव पटत नाही. त्या व्हिडीओत मी कुठेही मराठीचा उल्लेख केला नाही. ज्यांना मुद्दा बनवायचा आहे, ते मुद्दा बनवत आहेत. काही राजकारणी म्हणतायत की त्याला ठोका. मी मराठी माणूस, लोकांना रोजगार देतोय, तरीसुद्धा माझ्याच विरोधात अशा धमक्या दिल्या जात आहेत. मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतोय,” असं भावेश कावरे ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

याविषयी तो पुढे म्हणाला, “जो फ्लॅटचा मालक आहे तोच ठरवेल की तो फ्लॅट कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही. मी ठरवणारा कोणीच नाही. त्यातच एक महान नेता आपल्या युवाला असं बोलतोय की, दिसेल तिथे ठोका. हे कितपत योग्य आहे? मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. त्यांच्या राज्यातही शाकाहारी आणि मांसाहारी लोकंही होते.”

जाहिरातीच्या व्हिडीओवरून होणारा वाद पाहता अखेर भावेशने इन्स्टाग्रामवर त्याचा व्हिडीओ हटवला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?