AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tardeo Estate Agent: अशा दलालांना दिसेल तिथे ठोकलं पाहिजे..; एजंट भावेश कावरेला वरुण सरदेसाईंची थेट धमकी

दलाल भावेश कावरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वादात सापडला आहे. त्याच्या रीलवर आता वरुण सरदेसाई यांनीही कमेंट करत थेट इशारा दिला आहे. मांसाहार करणाऱ्यांना इथे घर मिळणार नाही, असं कावरेनं म्हटलंय.

Tardeo Estate Agent: अशा दलालांना दिसेल तिथे ठोकलं पाहिजे..; एजंट भावेश कावरेला वरुण सरदेसाईंची थेट धमकी
वरुण सरदेसाई, भावेश कावरेImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 13, 2026 | 11:42 AM
Share

सोशल मीडियावर रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच व्हिडीओवर आता शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी कमेंट केली आहे. असल्या जाहिराती करणाऱ्या दलालांना दिसेल तिकडे ठोकला पाहिजे, असं थेट त्यांनी या कमेंटमध्ये म्हटलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे हा ताडदेव परिसरातील एका घराबद्दल माहिती देताना दिसतोय. तुम्ही मांसाहार करत असाल तुम्हाला ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल, असं या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हे ठरवणारे एजंट कोण, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘ही मुंबई मराठी माणसाची आहे. आगरी-कोळी बांधवांची आहे. महाराष्ट्राच्या कष्टकरी, सर्वसामान्य माणसाची आहे. आणि मुंबईत कोणी काय खावं, काय खाऊ नये हे ठरवणारे तुम्ही कोण,’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

मांसाहारी लोकांना मुंबईत घरं नाकारल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी घाटकोपर, मुलुंड यांसारख्या भागांतही मांसाहार नागरिकांना घरं मिळवताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता ताडदेवमधील या व्हिडीओमध्ये पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. भावेश कावरेच्या या व्हिडीओवरून पुन्हा वाद पेटला आहे.

“हा जो ब्रोकर आहे, तो आमच्या ताडदेवच्या शिवसैनिकांना आता कळेलच. त्याचा आम्ही नीट समाचार घेऊच. म्हणजे आता ब्रोकर लोकं पोट धरतात, त्यांना चरबी येऊ लागली आहे का? आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या, जे कोणी बिल्डर आहेत, त्यांची भाषा आता ब्रोकर पण बोलत असेल तर त्याचा समाचार आम्ही घेऊ,” अशा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?