AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chatrapati SambhajiRaje : पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, संभाजीराजेंच्या समर्थकांची पोस्टरबाजी

Chatrapati SambhajiRaje : पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, संभाजीराजेंच्या समर्थकांची पोस्टरबाजी

| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 11:08 AM
Share

सलग दुसऱ्या दिवशी संभाजीराजे यांच्या समर्थकांनी शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी केल्याचं दिसून आलं.

नवी मुंबई : राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना विरुद्ध संभाजीराजे असं चित्र राज्यात पहायला मिळालंय. संभाजीराजे छत्रपती (Chatrapati SambhajiRaje) यांना शिवसेनेनं (Shivsena) शिवबंधन बांधण्याची अट ठेवली होती. तरच उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, संभाजीराजे यांचे समर्थक संतप्त झाल्याचं दिसून येतंय. त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) संभाजीराजे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केल्याचं दिसून आलं. गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, असं पोस्टरवर दिसून येतंय. बॅनरवरील मजकूर सर्वांचे लक्ष आकर्षित करत असून पुन्हा एकदा संभाजीराजे विरुद्ध शिवसेना वाद  निर्माण झाल्याचं दिसतंय. यावर आणखी एक ओळत आहे. त्यात म्हटलं की, ‘आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, असाही उल्लेख या पोस्टरमध्ये आढळतो. राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है, असा थेट इशाराच पोस्टरमधून देण्यात आलाय.

Published on: Jun 13, 2022 11:07 AM