Indus Waters Treaty : मोदी सरकारचा ‘पाक’विरोधात ‘वॉटर स्ट्राईक’ अन् व्हिडीओ व्हायरल, चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय….
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर मोठी कारवाई करत सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानं याचा पाकिस्तानला मोठा फटका बसणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात ‘वॉटर स्ट्राईक’ केल्याचे पाहायला मिळाले. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात पाच मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सिंधू जल करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय विशेष चर्चेत ठरला आहे. अशातच चिनाब नदीच्या पाण्याची पातळी दोन ते तीन फुटांनी कमी झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या सियालकोटमधील मराला या गावातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक माणूस चिनाब नदी पाहतोय आणि यावेळी भारताकडून सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतोय असं तो म्हणतोय. तर चिनाब नदीची पाणी पातळी देखील हा माणूस दाखवत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

