Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट, छगन भुजबळ यांचा मोठा दावा काय?
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण अद्याप तापलेलंच आहे. आरक्षणाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. अशातच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय असा थेट दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. तर ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय, असेही मोठं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय
बीड, ६ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील हे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीवर अद्याप ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र इतर कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असे काही नेत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य करत ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय असा थेट दावा केला आहे. तर ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय. ५४ टक्के इतका असलेला ओबीसी समाज यामध्ये २७ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. या २७ टक्क्यांमध्ये VJNT, धनगर, माळी, कुणबी आणि तेली समाजाचाही समावेश आहे. इतका मोठा असलेला ओबीसी समाज संपवण्याचा घाट गेल्या काही दिवसांमध्ये घातला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीला वेगवेगळ्या स्तरावरील लोकं जबाबदार आहेत. अगदी मंत्रालयापासून ते खालपर्यंत काय षडयंत्र आहे? असा सवालही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Nov 06, 2023 05:43 PM
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
