Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार? सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज त्या दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. मात्र यानंतरच आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्या खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज त्यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतीली असून राजीनामा सुपुर्द केला आहे. मात्र यानंतरच आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे.
4 मे 2026 रोजी बारामतीतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवला. या दणदणीत विजयानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे, म्हणून त्यांना खासदार हे पद सोडावं लागणार आहे. तर आता खासदार या पदावर छगन भुजबळ यांना जागा मिळणार का, या चर्चांनी जोर धरला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, याआधीही छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, त्यामुळे आता त्यांना ही रिक्त जागा मिळणार का, हे आता येत्या काळातच कळेल.
Published on: May 06, 2026 05:23 PM
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट

