मला राज्यसभेवर जायचंय पण आता… छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यांनी राज्यसभेवर जाताना आपल्या मंत्रिपदाची जबाबदारी समीर भुजबळ यांच्याकडे देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात होते. यानंतर विविध राजकीय स्तरावर चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर आता स्वतः छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आपल्याला लोकसभा आणि राज्यसभेत जाण्याची इच्छा होती. यापूर्वीही अनेकदा संधी जवळ आली पण मिळाली नाही.
भुजबळ यांनी इतर नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळालेल्या संधींचा उल्लेख करत समान न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. मकरंद पाटील, सुनेत्रा पवार आणि तटकरे कुटुंबाचे उदाहरण देत त्यांनी आपल्यालाही तोच नियम लागू व्हावा, अशी मागणी केली होती. तसेच भाजपने थेट नकार दिला, या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते सरळ म्हणाले यामध्ये भाजपची भूमिका नव्हती.
Published on: Jun 08, 2026 12:18 PM
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत

