Pune | पुण्यातील कार्यक्रमात छगन भुजबळांची शेरोशायरी

पुणे: राज्यातील ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खुमासदार शेरोशायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ दर्द छिपे है सिने मै… सौ दर्द छिपे है सिने मै… पर कुछ अलग ही मजा है हसकर जिनें मैं, असं सांगतानाच पुरे पाच साल सरकार काम करेंगी, उसके बाद जायेंगी, असं छगन भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या खुमासदार शेरोशायरीने भाषण रंगात आलेलं असतानाच अचानक लाईट गेली. त्यानंतरही भुजबळ यांनी भाषण सुरूच ठेवलं. हमारी अवाज दबाने की कोशिश ना करो, असं भुजबळ यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. निमित्त होतं महात्मा फुले समता पुरस्काराच्या वितरणाचं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI