AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक

Aurangabad | औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक

Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 17, 2022 | 12:42 PM
Share

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्याची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्याची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची आज दुपारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मोठा उहापोह सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठं जल आंदोलन छेडलं होतं. भाजपच्या नेतृत्वात आतापर्यंत अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. अनेक पक्षांनी पाणी प्रश्नासाठी मोर्चे काढले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पाणी प्रश्नावर बैठक बोलावली आहे. औरंगाबाद्च्या विभागीय आयुक्तांबरोबर ही बौठक होणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सचिन चव्हाण याबैठकीस उपस्थित राहणार आहेत. पाणी पुरवठा विभागाचे सचिव सुद्धा ह्याबैठकीस उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादातील वेगवेगळ्या भागांना कसा पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. अशा प्रश्नांवर याबैठकीतून तोडगा काढण्यात येणार आहे.

Published on: Jun 17, 2022 12:42 PM

Follow Us