शिवसेनेच्या वर्धापनदिनावरून दोन्ही गटात जुंपली; ठाकरे म्हणतात, परवा गद्दार दिन…तर शिंदे म्हणतात कॅसेट तीच!
शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची दोन्ही गटांनी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं जाणार आहे. दरम्यान काल झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची दोन्ही गटांनी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं जाणार आहे. दरम्यान काल झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला 20 जूनला एक वर्ष पूर्ण होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर “उद्धव ठाकरे यांनी कुठलातरी नवीन दिवस काढला आहे, कॅसेट तीच आहे,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. “तसेच उद्धव ठाकरे कोणाच्या विचारांचा वर्धापनदिन साजरा करणार,” असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

