Devendra Fadnavis : ओबीसी समाजाच्या 76 मागण्या… फडणवीस म्हणाले, चिंता करू नका आम्ही…. OBC महासंघाच्या अधिवेशनात मोठं विधान
आम्ही ओबीसी समाजासाठी 50 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता महाराष्ट्रप्रमाणेच गोव्यात देखील ओबीसी समाजासाठी आपण चांगले निर्णय घेऊ, देवेंद्र फडणवीस असे म्हणाले.
गोव्यामध्ये ओबीसी महासंघाचे अधिवेशन सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनात उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मला ओबीसी समाजासह सर्व समाजाने आर्शिवाद दिलाय. एखाद्या समाजासाठी लढणार म्हणजे दुसऱ्या समाजाच्याविरोधात आहे, असे चित्र रंगवणे चुकीचे आहे. मागच्या काळात आपण ज्या-ज्या मागण्या ओबीसी समाजाकडून कऱण्यात आल्या होत्या. त्या-त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. आजही पुन्हा नव्या मागण्या आल्यात. समाजाचं काम हे असंच असलं पाहिजे. समाजाचे नेते जर समाधानी झाले तर समाजाचं कल्याण होत नाही.’, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, ‘आज बबनराव यांनी पुन्हा ७६ मागण्या मांडल्या आहेत. त्यापैकी २४ मागण्या केंद्र सरकारच्या असून त्यांच्याकडे पाठवू, तर २५-२६ मागण्या राज्य सरकार आणि महाराष्ट्राच्या आहेत. त्यावर मी काम करेन मी तुम्हाला आश्वस्त करतो.’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली

