Mumbai BEST : एक पद अन् दोन नियुक्त्या… महायुतीत समन्वय नाही, मतभेद उघड? गोंधळावर सरकारचं स्पष्टीकरण काय?
एका विभागात एक पद रिक्त असताना त्यावर दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्रानं आता नवी चर्चा सुरू झाली आहे. या नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या खातींमधल्या असमन्वयासंदर्भात सुद्धा बोट ठेवलं जातंय.
अधिकारी नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांमध्ये सुप्त संघर्ष रंगात असल्याची चर्चा आहे. कारण फडणवीस आणि शिंदे यांच्या अखत्यारीमधल्या खात्यांनी एकाच दिवशी एकाच पदावर दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र काढले आहे. त्यामुळे नियुक्तीचे पत्र मिळालेले दोन्ही अधिकाऱ्यापुढे कोणत्या आदेशाचं पालन करायचं हा संभ्रम आहे. सामान्य प्रशासन विभाग फडणवीसांच्या अखत्यारीमध्ये तर नगर विकास खातं शिंदेंकडे आहे. बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार अधिकारी नेमणुकीचे पत्र प्रशासनाकडून जाहीर झालं. मात्र फडणवीसांच्या अखत्यारीमधल्या सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी आशिष शर्मा यांना नियुक्तीचे आदेश दिले. तर शिंदे यांच्या नगर विकास खात्याने अश्विनी जोशी यांना नियुक्तीचे पत्र पाठवलं. दोन्ही नियुक्तीचे आदेश हे पाच तारखेला देण्यात आले. मात्र पद एकच आहे आणि नियुक्तीची पत्र मात्र दोन अधिकाऱ्यांना गेल्यामुळे गोंधळ झाला आहे.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा

