Devendra Fadnavis : ठाकरे भरकटले, राजकारणात वाट शोधावी लागते; फडणवीसांनी 2019 मध्ये जे घडलं ते सारं सांगितलं
इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि इंडियन एक्सप्रेसच्या राष्ट्रीय ओपिनियन एडिटर वंदिता मिश्रा यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले
२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राजकारणात कोणा हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. तर राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहवं लागतं, असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस म्हणाले. जो योग्य मार्ग होता त्यावरून आमचे साथीदार भरकटले तर ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो, त्यांना घेऊन पुढे गेलो असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. बुधवारी इंडियन एक्सप्रेसच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांच्याकडून पलटवार कऱण्यात आला आहे. फडणवीसांना नितीमूल्याची चिंता आहे. त्यांनीच नितीमूल्य का नाही जपली? असं संजय राऊत म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही स्वतःला खालच्या स्तरावर नेलं खरं तर खरा दगा भाजपने दिला असल्याचे राऊत म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

