Devendra Fadnavis : कोकाटेंच्या ‘भिकारी सरकार’ वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांची पुन्हा तंबी, स्पष्टच म्हणाले …हे चुकीचं
विधानभवनात जेव्हा आपलं कामकाज नसलं तरी आपण सिरीअसली बसणं गरजेचे आहे. काही वेळा असं होतं की तुम्ही कागदपत्र वैगरे पाहतात. पण रमी खेळताचा व्हिडीओ योग्य नाही.’, असं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटेंच्या कृतीवर म्हणाले होते. तर आज पुन्हा एकदा तंबी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा तंबी दिली आहे. भिकारी शेतकरी नाही तर शासन आहे, असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले, असं माणिकराव कोकाटे आज म्हणाले. दरम्यान, स्पष्टीकरण देताना कोकाटेंची गल्लत झाली. मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

