Devendra Fadnavis : सभागृहात रमी खेळणं चुकीचं.. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर अजित पवार कोकाटेंचा राजीनामा घेणार?
कृषीमंत्र्यांनी आपण रमी खेळत नसल्याचे म्हणत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. मात्र व्हिडिओमध्ये त्यांच्या कृती स्पष्ट दिसत असल्याने हे स्पष्टीकरण समाधानकारक वाटत नाही. विरोधी पक्षांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
विधानसभेत रमी खेळताना महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर कोकाटे यांच्यावर तीव्र टीका झाली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा सुरू असताना मंत्र्यांनी रमी खेळल्याचे दृश्य पाहून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसून, मोबाईलवरील जाहिरात स्किप करत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा या प्रकरणावर भाष्य केले आहे.
‘अतिशय चुकीचं आहे. विधानभवनात जेव्हा चर्चा चालते त्यावेळी आपलं कामकाज नसलं तरी आपण सिरीअसली बसणं गरजेचे आहे. काही वेळा असं होतं की तुम्ही कागदपत्र वैगरे पाहतात. पण रमी खेळताचा व्हिडीओ योग्य नाही.’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, व्हायरल व्हिडीओ संदर्भात माणिकराव कोकाटेंनी खुलासा केला की ते रमी खेळत नव्हते. पण जे काही घडलं ते भूषणावह नाही, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

