AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Devendra Fadnavis : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Jun 15, 2025 | 6:04 PM
Share

Indrayani River Bridge : मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली असून यावर मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात 25 ते 30 पर्यटक वाहून गेलेले आहेत. वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. ज्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. काही लोक अडकले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचत आहे. काही लोक वाहून गेल्याची भीती आहे, परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे सध्या यावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.

Published on: Jun 15, 2025 06:04 PM