Video : ’15 दिवसांवर सिनेमा निघू शकतो’ एकनाथ शिंदेंनी स्वतःच सांगितलं, बंडखोरीची स्टोरी सिनेमाला साजेशी!
Eknath Shinde Speech Video : आम्ही केलेल्या बंडखोरीची दखल 133 देशांनी घेतल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
मुंबई : आपल्या 15 दिवसांवर सिनेमा निघू शकतो, असं सूचक विधान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. त्यांनी स्वतःच भाषणात राजकीय भूकंपानंतर झालेल्या घडामोडींचा घटनाक्रम हा सिनेमाला साजेसा असल्याचं एकप्रकारे मान्य केलं. इतकंच काय तर शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या काय झाडी काया डोंगार, काय हाटेल, या वक्तव्यावरुन त्यांनी टोला लगावला. शहाजी बापू पाटील यांच्या कलागणांना वाव देण्याचं काम आम्ही केल्याचंही शिंदे म्हणालेत. दरम्यान, आम्ही केलेल्या बंडखोरीची दखल 133 देशांनी घेतल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता रविंद्र नाट्य मंदिरात शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे (Ekanth Shinde Ravindra Natya Mandir Speech Video Uncut) यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी रविंद्र नाट्य मंदिरात उपस्थितांनी खचाखच भरलं होतं. आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमदारांना मिळणारा निधी, संजय रााऊत यांवरुनही जोरदार फटकेबाजी केली. तसंच संजय शिरसाट यांचे त्यांनी यावेळी आभारही मानलेत. शिवसेना आणि शिवसैनिकाला वाचवण्यासाठी केलेली ही क्रांती आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढला, तो ही काही लोकांना आवडला नाही, असं म्हणत त्यांनी टोलाही लगावलाय.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात

