‘राज ठाकरेंनी चर्चेविना उमेदवार उभे केले म्हणून…’, माहीमच्या जागेसंदर्भात एकनाथ शिंदे स्पष्ट बोलले
माहिम मतदारसंघामधून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र सरवणकर माघार घेण्यास तयार नाहीत.
महायुतीशी चर्चेविना राज ठाकरेंनी उमेदवार उभे केल्यानं माहीमचा घोळ झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर माहीमच्या जागेबाबत प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले की, सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी आक्रमक आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल तुटायला नको हे पाहणं नेत्यांचं काम असतं. ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीसोबत होते.आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांना विचारणा कऱण्यात आली होती की, विधानसभेसंदर्भात तुमची रणनिती कशी आहे? त्यावेळी ते म्हणाले की, पहिले शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पहिले ठरूदेत त्यानंतर आपण चर्चा करू, पण त्यांनी थेट उमेदवारांची घोषणा केली.’, असे एकनाथ शिंदे म्हणाले. सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचा जुना नेता आहे, त्यांच्याशी मी बोललो. पण त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यास आक्रमक आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांचं मनोबल तुटायला नको हे पाहणं देखील नेत्यांचं काम असतं असे एकनाथ शिंदे म्हणाले.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

